Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज ४५१ पाॅझीटीव्ह


सांगली (राजेंद्र काळे )
       सांगली जिल्ह्यात आज बुधवार ता. ७ रोजी ४५१ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर दिवसभरात ५९९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
        सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू होती. गेल्या दहा बारा दिवसात ही वाढ आटोक्यात राहिली आहे तर कोरोनामुक्त होणार्या रुग्णाच्या संख्येत  वाढ होत आहे. आज बुधवार ता.७ रोजी ४५१ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात ५९९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज सांगली महापालिका क्षेत्रात ६६ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर ५१ तर मिरज शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ३४, जत -२५, कडेगाव - ५५, कवठेमंकाळ -१६, खानापूर - ३२, मिरज- ३९, पलूस- २५ शिराळा- २२, तासगाव- ८१ आणि वाळवा -५६ इतक्या रुग्णांचा
समावेश आहे.
       तर सांगली जिल्ह्यात आज १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments