रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील

: अल्पसंख्यांक सांगली जिल्हा अध्यक्षपदी मोहसीन पटवेकर यांची निवड झाली. नुतन पदाधिकार्यांना आ. सदाभाऊ खोत यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

पेठ ( रियाज मुल्ला)
        राजेंद्र पाटील (चिकुर्डे) यांची रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी तर मोहसिन पटवेकर (इस्लामपूर) यांची रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या हस्ते पाटील व पटवेकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
      या निवड समारंभ प्रसंगी उपस्थित युवा नेते मा. सागर खोत (भाऊ) , रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते मा. लालासो पाटील, रयत क्रांती संघटनेचे राज्य सचिव मा. भास्कर कदम (नाना) , रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. बजरंग भोसले, रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. विनायक जाधव, रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष मा. किरण उतळे, रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. अरुण गावडे, रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष लालासो धुमाळ, शशिकांत शेळके रयत क्रांती वाहतूक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश माने आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments