Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाडमध्ये चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले

कुपवाड (प्रमोद अथणीकर)
        शहरातील हनुमान नगर बसस्थानकासमोरील मोबाईल दुकान अज्ञात चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. चोरट्यांनी या दुकानातील मोबाईल, रोख रक्कमेसह सुमारे २५ हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. तसेच या दुकानालगतची दोन कापड दुकानेही चोरटय़ांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची रात्री उशीरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती .
           पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हनुमान नगर बसस्थानकासमोरील प्रशांत हंजी यांच्या मालकीचे मोबाइल दुकान आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या मोबाईल दुकानाचे शटर अज्ञात चोरटय़ांनी पारीने उचकटले. त्यानंतर दुकानात रिपेअरी करण्यासाठी आलेले पाच वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, हेडफोन व रोख रक्कम असा एकूण अंदाजे 25 हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे .
         तसेच त्या दुकानाच्या शेजारी असणारे दोन कापड दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्नही यावेळी चोरट्यांनी केला. ऐन सणाच्या वेळेत ही चोरीची घटना घडल्याने कुपवाड परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेची रात्री उशीरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती .

Post a comment

0 Comments