Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात आज २५ पॉझिटिव्ह

:विट्यात १० , साळशिंगेत ४ रुग्ण पॉझिटिव्ह

विटा (मनोज देवकर )
      कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले तरी अजून धोका टळला नाही असे चित्र आहे . खानापूर तालुक्यात आज २५ रुग्णांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. विटा शहरात १० रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत .

बेनापूर मध्ये ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत . बामणी मध्ये तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत . साळशिंगे गावात चार रुग्ण तर लेंगरे , जाधव वाडी , मंगरूळ मध्ये प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे .

आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या २१८४ झाली असून ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत . १७०६ रुग्ण बरे झाले असून ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments