Daily Mahasatta

Daily Mahasatta

विशाल कुंभार यांना सरपंचपदाची ' लाॅटरी '

: जुनेखेड (ता.वाळवा) ग्रामपंचायत सरपंचपदी अनपेक्षित पणे विशाल कुंभार यांची निवड 

वाळवा ( रहिम पठाण)
       जुनेखेड (ता.वाळवा) ग्रामपंचायत सरपंचपदी अनपेक्षित पणे विशाल कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर कुंभार यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
        गेल्या 3 वर्षा पूर्वी जुनेखेड ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली. गावातील राष्ट्रवादी गट व हुतात्मा गट अशी सरळ लढत होत असते. परंतु यावेळी गावातील प्रमुख नेते, सुजान नागरीक तरुण मंडळीनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. बिनविरोध करताना दोन्ही गटाना अडीच अडीच वर्ष सरपंच पद देण्याचे ठरले होते.
        सुरूवातीला राष्ट्रवादी गटातून सरपंच पदी मा.दत्तात्रय गावडे व नंतर अडीच वर्ष हुतात्मा गटाचे मा. प्रकाश आंबी याना संधी देण्याचे ठरले तशी प्रत गावातील नागरिकांना देण्यात आली आणि आनंद साजरा करण्यात आला. दत्तात्रय गावडे यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. परंतु सध्याच्या सरकारने लोकनियुक्त सरपंच कायदा रद्द केल्याने आणि अधिकृत सभागृहाचे सभासद प्रकाश आंबी नसल्याने लोकनियुक्त सरपंच पदाचा अर्ज करणे अवघड झाले व त्याच बरोबर सध्या सर्वच निवडणूका कोरोना मुळे घेता येत नाहीत. अशा अडचणी निर्माण झाल्या व हुतात्मा गटाचा कालखंड पुढे जाऊ लागला अशा प्रसंगी पर्याय म्हणून सभागृहाचे अधिकृत सदस्य असणारे विशाल कुंभार यांची अनपेक्षितपणे नियुक्ती सरपंच पदासाठी करण्यात आली.
       कोविड महामारीनंतर निवडणूक पार पडेल व त्यावेळी विशाल कुंभार सरपंच व सदस्य पदाचा राजीनामा देतील व अधिकृत पणे सभागृहाचे प्रथम सदस्य म्हणून प्रकाश आंबी व नंतर सरपंच म्हणून निवडले जातील. अशा पध्दतीचा निर्णय हुतात्मा गटा कडून घेण्यात आला. विशाल कुंभार हे पशुवैद्यकीय क्षेत्रात डाॕक्टर म्हणून काम करतात. मिळालेल्या संधीच्या काळात गावातील विकास कामासाठी कटीबद्ध राहीन असे नवनियुक्त सरपंच यानी सांगितले.

Post a Comment

0 Comments