Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रलंबित दिव्यांग कल्याण निधी दिवाळीपूर्वी द्यावा अन्यथा शिमगा आंदोलन : विक्रम ढोणे

जत ( सोमनिंग कोळी)
      जत नगरपरिषदकडील प्रलंबित असलेला दिव्यांग कल्याण निधी दिवाळीपूर्वी दिव्यांग बांधवांना देण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी निवेदनाव्दारे जत नगरपरिषदेकडे मागणी केली आहे. जत शहरातील दिव्यांग बांधवांचा दिव्यांग कल्याण निधी जत नगरपरिषदेकडून सन २०१२ पासूनचा देणे प्रलंबित असून तो व्याजासह दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वी द्यावा अन्यथा दिवाळीत नगरपरिषदे समोर शिमगा करण्याचा इशारा विक्रम ढोणे यांनी दिला आहे
         प्रलंबित दिव्यांग कल्याण निधी साठी जत नगरपरिषदेच्या स्थापने दिवशी ८ जून २० रोजी याप्रश्नी लक्षवेधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर जत नगरपरिषदेने लेखी आश्वासन देऊन पुढील सर्वसाधारण सभेत विषय घेऊन दिव्यांग बांधवांचा प्रश्न निकालात काढण्याचे लेखी आश्वासन देऊन लक्षवेधी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेतली. पण दिव्यांग बांधवांचा प्रश्न सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये घेतला नाही की साधी चर्चाही केली नाही. यावरून जत नगरपरिषद दिव्यांग कल्याण निधी वाटपाबाबत उदासीन असल्याचे दिसते तरी जत नगरपरिषदेने वेळकाढूपणा न करता शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांचा दिव्यांग कल्याण निधी हा त्यांच्या हक्काचा असून तो जत नगरपरिषदेकडील २०१२ पासुनचा प्रलंबित असलेला दिव्यांग निधी व्याजासह दिव्यांगाना दिवाळीपूर्वी देऊन दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करावी. अन्यथा ऐन दिवाळीत जत नगरपरिषदे समोर शहरातील सर्व दिव्यांग बांधव शिमगा करतील असा इशारा युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments