Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी संजय पाटील

वाळवा ( रहिम पठाण)
      वाळवा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड जिल्हाधिकारी डाॕ. अभिजीत चौधरी यांनी जाहीर केली. समितीमध्ये अध्यक्ष व नऊ सदस्य आहेत.
        राजारामबापू बँकेचे संचालक व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष मा. संजय पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर सदस्य म्हणून युवराज कांबळे, श्रीमती प्रणिता पेठकर, संदीप माने, राहुल टिबे, सुहास रुगे, रामचंद्र पाटील, इलिहास पिरजादे, हेमंत पाटील, दिनकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील अनेक गोरगरीब लोकांच्यासाठी हीताचे निर्णय घेऊन एक नविन आदर्श निर्माण करावा हीच अपेक्षा आहे. संजय पाटील यांच्या कामाचा अनुभव पाहता ते नक्की लोकांच्या अडचणी सोडवतील अशीच आशा आहे.

Post a Comment

0 Comments