अतुल पाटील ठरले कोरोनाच्या रुग्णांसाठी 'देवदूत '

पेठ (रियाज मुल्ला)
        पेठ परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना सुविधा मिळाव्यात यासाठी प्रथमोपचार केंद्र सुरू करुन त्याठिकाणी ऑक्सीजन सुविधा उपलब्ध करून देणे आणि आवश्यकते प्रमाणे रुग्णांना शासकीय किंवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्यासाठी धडपडणारे पेठचे युवानेते अतुल पाटील हे कोरोना बाधित रुग्णासाठी अक्षरशः देवदूत बनल्याची चर्चा परिसरातील नागरिकांतून सुरू आहे.
         मार्च महिन्या पासून ऑगस्ट पर्यंत पेठ गावामध्ये एकही कोरोना रुग्ण न्हवता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्ण सापडले. हि रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. पेठ परिसरात वाढत असलेले कोरोना बाधित रुग्ण व त्यांचे वाढते प्रमाण आणि होणारी असुविधा ओळखून माझं गाव माझी जबाबदारी या भावनेतून पेठचे युवा नेते मा.अतुल पाटील (बापू) यांच्या पुढाकाराने व पेठ डॉक्टर असोसिएशन यांच्या सहकार्याने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते व आ. मानसिंगभाऊ नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पेठ येथे केअर सेंटरचे (प्रथमोपचार केंद्र) उद्घाटन झाले.
       त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण प्रथमोपचार घेण्यासाठी येऊ लागले. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशा रुग्णांना ऑक्सीजन उपलब्ध करून देणे तसेच त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता करून देण्याचे काम डॉक्टरांच्या सहकार्याने स्वतः मा. अतुलबापू करत आहेत. त्याचबरोबर ज्या रुग्णांना घरी विलगीकरणाची व्यवस्था नसेल नसेल अशा रुग्णांनाही याठिकाणी राहण्याची व डॉक्टरांच्या सल्ल्याची मोफत सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक युवा नेते अतुल पाटील यांना धन्यवाद देत आहेत. या प्रथम उपचार केंद्रामध्ये आज अखेर सतरा रुग्णांना ऑक्सीजन उपलब्ध करून देऊन पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले. त्याचबरोबर विलगीकरण करण्यात आलेले 10 पेशंट कोरोना मुक्त होऊन आपल्या घरी जाण्याच्या मार्गावर आहेत.
           गोळेवाडी येथील माळी यांच्या कुटुंबातील आई व मुलगा आपला विलगीकरणाचा कार्यकाल पूर्ण करून घरी गेले. यावेळी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी युवा नेते अतुल पाटील व उपचार करणारे डॉक्टर यांना धन्यवाद दिले. या कोरोना सेंटर साठी पेठ गावातील डॉ. सुभाष भांबुरे, डॉ. मुसाअली जमादार, डॉ.विशाल दंडवते, डॉ. महेश पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. सौ. विद्या पाटील, डॉ. टी. एस. पाटील नेहमीच सज्ज असतात. तसेच या ठिकाणी व्यवस्था पहाणारे यश पेठकर, प्रथमेश कोळेकर, शिवराज पाटील, शुभम माळी,संतोष बाबर आणि अतुल पाटील मित्र परिवार, युवक राष्ट्रवादी व राष्ट्रवादी सोशल मीडियाचे सर्व कार्यकर्ते यांचेही माळी कुटुंबियानी आभार मानले.

Post a comment

0 Comments