Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महाविकास आघाडीचा ' डीएनए ' भ्रष्टाचाराचा : आ गोपीचंद पडळकर

सांगली ( मनोज देवकर )
        जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाचे भरीव काम झाले आहे. खानापूर आटपाडी तालुक्यात झालेले काम येऊन बघा. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच महाविकास आघाडीचे नेते आरोप करत आहेत. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. उलट महाविकास आघाडीचा डीएनए च भ्रष्टाचाराचा आहे अशी टिका आ. गोपीचंद पडळकर यांनी केली           आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील बंधाऱ्यावर चित्रित केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी टिका केली आहे. नाम फाऊंडेशन , सत्यमेव जयते व लोकसहभागातून तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अग्रणी नदी व खानापूर आटपाडी तालुक्यात झालेली कामे येऊन बघा असे आवाहन ही त्यांनी केले. कुणी कितीही प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले तरी देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता वाढतच आहे . गेल्या दहा महिन्यातील अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने जलयुक्त शिवार ची चौकशी सुरू केली आहे. यातुन काहीही निष्पन्न होणार नाही. उलट सरकार ने कोविड च्या साथीच्या काळात हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची लूट झाली त्याची चौकशी करावी असे पडळकर यांनी म्हंटल आहे.

Post a comment

0 Comments