शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी : कडेगावात मनसेची मागणी

 कडेगाव (संदीप कुलकर्णी)
       अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांना निवेदन देण्यात आले.
       या मागणीचे निवेदन कडेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राहुल सकट व कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष युवराज जरग यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनामध्ये म्हंटले आहे, सोयाबीन, मका या पिकांना शंभर टक्के विमा देण्यात यावा. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच मागील वर्षी खरीद न केलेल्या मका पिकाला प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान द्यावे.
         राज्य सरकारने मागच्या वर्षी ऑक्टोंबर 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांना 2019 - 20 यावर्षी कर्ज माफी ची अंमलबजावणी करावी. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने कर्ज मुक्त करावे इत्यादी प्रमुख मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनात केल्या आहेत यावेळी संग्राम चव्हाण, पवन सूर्यवंशी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments