Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाच्या संकटात रास्त धान्य दुकानदाराचे योगदान मोलाचे : युवानेते प्रतिक पाटील

इस्लामपूर : येथे रेशन कार्ड वाटप करताना प्रतिकदादा पाटील. समवेत उपनगराध्यक्ष दादासो पाटील,खंडेराव जाधव,एस. ए.सवदे, डॉ.संग्राम पाटील, पिरअली पुणेकर, स्वरूप मोरे व रास्त धान्य दुकानदार.

इस्लामपूर ता.( सूर्यकांत शिंदे )
        वाळवा तालुक्यातील जनता व कार्यकर्ते एकसंघपणे कोविडशी दोन हात करीत आहेत. आपण निश्चितपणे कोविडला रोखण्यात यशस्वी होवू, असा विश्वास युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या संकट काळात गोर-गरीब, सामान्य कुटुंबांच्यापर्यंत शासनाचा धान्य पुरवठा करण्यात रास्त धान्य दुकानदारांनी मोलाचे योगदान केले आहे, अशा शब्दात त्यांनी दुकानदारांच्या कामाचे कौतुक केले.
         इस्लामपूर शहरातील ७४५ रेशन कार्ड वाटपाचा श्री.पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, माजी सभापती खंडेराव जाधव, पुरवठा अधिकारी एस. ए. सवदे, नगरसेवक डॉ.संग्राम पाटील, माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, युवक राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष स्वरूप मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
         प्रतिकदादा पाटील म्हणाले, मी तालुक्यातील बुथ अध्यक्षांशी ऑन लाईन संवाद साधत चौकशी करीत आहे. आपल्या तालुक्यात आपण ८६ हजार कुटुंबांना मास्क वाटप केले आहेत. लॉक डाऊन काळात ब गटातील कुटुंबांना धान्य दिले आहे. आज अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊन कोरोना केअर सेंटर उभा करीत आहेत. लस कधी येईल माहीत नाही. आपण आपली व आपल्या कुटुंबाची विशेषतः जेष्ठ नातेवाईकांची काळजी घ्या.दादासो पाटील म्हणाले, ना.जयंतराव पाटील यांनी शहर, तालुका,व जिल्ह्यातील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे रेशनकार्ड मिळवून दिले. ब गटातील कार्ड धारकांना लॉकडाऊन काळात धान्य दिले. माणुसकीची थाळी माध्यमातून हजारो नागरिकांना भोजन दिले.
डॉ.संग्राम पाटील म्हणाले, ना.जयंतराव पाटील यांनी सत्ता नसताना रेशनकार्ड, सात/बारा उतारे आदी प्रश्नावर जनआंदोलन केले. मात्र आपली सत्ता येताच जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून सामान्य माणसांचे छोटे-छोटे प्रश्न सोडविले आहेत.
पुररवठा अधिकारी एस.ए.सवदे म्हणाले, आम्ही ना.जयंतराव पाटील यांच्या सुचनेप्रमाणे राबविलेल्या मोहिमेत आमच्याकडे ७ हजार ५०० अर्ज आले. त्याप्रमाणे आम्ही रेशन कार्ड तयार केली. आता वाटप होत आहे. असे उपक्रम सातत्याने घ्यायला हवेत. 
         यावेळी रास्त धान्य दुकानदार विलास भिंगार्डे, शिवाजी सूर्यवंशी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे संघटक राजाराम जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी रणजित गायकवाड, आबीद मोमीन,राजू खरात,राजू अडसूळ,मानसिंग पाटील, राजवर्धन लाड, संभाजी देवकर, विनायक सदावर्ते, प्रा.शरद पाटील,अंगराज पाटील, जमीर मगदूम यांच्यासह इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,व रास्त धान्य दुकानदार उपस्थित होते. युवक राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments