Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगा मी ' कोणाची ' ? ... अशी अवस्था कुपवाड चावडीची

: एजंट लोकांचा चावडी मध्ये धुमाकूळ

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
        कुपवाड शहराच्या मध्य भागी असलेल्या चावडीला न नाव आहे, ना कोणी वाली आहे, अशी अवस्था झाल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
        कुपवाड परिसरामध्ये असणाऱ्या चावडीची अवस्था न घरका ना घटका अशी झाली असून या चावडीला न नाव आहे, ना काही गाव आहे अशी अवस्था आहे. कित्येक दिवसापासून या चावडीला नाव देण्यात आले नाही नेमकी कोणत्या गावची चावडी हेच लोकांना समजत नाही.
        याठिकाणी काही दिवसां पूर्वी तलाठ्याने परस्पर नोंद घातल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून तो अद्याप फरारी आहे. आता कुपवाड तलाठी ऑफिस मध्ये उतारे काढण्यास येणाऱ्या लोकांचे हाल होत आहे. अनेक वृध्द, नागिरक व अपंग नागरिक उतारे काढण्यासाठी ये जा करत असतात पण तलाठी नसल्याने त्यांचे हाल होत आहे.
         चावडी चे कामकाजाचे वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते पण इथे कोण विचारत नसल्याने आओ जाओ काम तुम्हारा अशी अवस्था कर्मचार्याची आहे. उतारे काढण्यास आलेल्या नागरिकाचे म्हणणे आहे नेमकं चावडी आहे की आणखी दुसरे ऑफिस आहे हेच नेमके यातून कळत नाही. सांगा मी कोणाची ? अशी अवस्था झालेल्या या चावडीचा कारभार सुधारण्यासाठी महसूल विभागाने गांभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments