सांगलीच्या कोरोना योद्धांची कामगिरी राज्यात गौरवास्पद : आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर.

सांगली : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर सुरेश पाटील यांना चिन्मयसागर कोरोना नॅशनल वॉरियर पुरस्काराने सन्मानित करताना आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर.

: चिन्मयसागर कोरोना वॉरियर' पुरस्काराचे वितरण

सांगली[प्रतिनिधी]
    कोरोनाच्या जागतिक संकटात सांगली जिल्ह्यातील कोरोना योद्धांनी केलेली कामगिरी संपूर्ण राज्यात गौरवास्पद आहे. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे आपले आद्य कर्तव्यआहे, असे प्रतिपादन आरोग्यराज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांनी केले.
    श्री चिन्मयसागर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वर्ल्ड डॉक्टर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने प. पु. मुनिश्री चिन्मयसागर महाराज यांच्या प्रथम समाधीवर्षाचे औचित्य साधून कोरोना सारख्या महामारीच्या काळात अतुलनीय योगदान देणाऱ्या समाजातील मान्यवरांचा ''चिन्मयसागर कोरोना वॉरियर''पुरस्काराने ना. यड्रावकर-पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
    स्वागत व प्रास्तविक माजी महापौर सुरेश पाटील यांनी करताना, ' याचदिवशी चिन्मयसागर महाराजांनी समाधी घेतली होती. त्यांनी सर्व जातीधर्मासाठी मोठे योगदान दिले आहे. जेंव्हा मुनींचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी चिन्मयसागर महाराजांचे नाव अग्रभागी असेल असे सांगितले. चिन्मयसागर महाराजांचे बालपणीचे मित्र असणाऱ्या डॉ. सोमशेखर पाटील यांनी महाराजांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनोगत व्यक्त करताना,' कोरोनाबाबत दक्षता बाळगून स्वतःला सुरक्षित ठेवणारे सर्वजण कोरोना योद्धे आहेत. अजून कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट केंव्हाही येऊ शकते.आपले दोन मोठे सण येत आहेत. आमच्या सेवेत कधीही खंड पडणार नाही.आम्ही आमची जबाबदारी नेहमीच पूर्ण क्षमतेने पार पडू असे सांगितले.
    ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते चिन्मयसागर कोरोना नॅशनल वॉरियर पुरस्काराने जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर सुरेश पाटील, डॉ.सोमशेखर पाटील, डॉ,भरत मुडलगी, डॉ.जयधवल भोमाज, डॉ.महाधवल भोमाज, डॉ. शरद देसाई, डॉ. उमेश पाटील यांना तसेच चिन्मयसागर कोरोना वॉरियर पुरस्काराने दक्षिण भारत जैनसभा, डॉ. सुनील आंबोळे, डॉ. संजय साळुंखे, डॉ.भूपाल गिरीगोसावी, डॉ. रवींद्र ताटे, असिफ बावा, हयात फाऊंडेशन, पीरअली पुणेकर, संजय बेले, सतीश साखळकर, आयुष सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील, सलगरे सरपंच तानाजी पाटील, शशिकांत पाटील, स्वच्छतादूत राकेश दड्डणावर, नगरसेवक अभिजित भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
    आपल्या भाषणात आरोग्यराज्यमंत्री ना. पाटील-यड्रावकर यांनी,' आज सर्वजण मोठ्याधीराने कोरोनाशी लढत आहेत. कोरोनाबाबत दक्षता घेतली पाहिजे. हे संकट अजून संपलेले नाही. सरकार वेगवेगळ्या माध्यमातून जनगागृतीसोबतच विविध उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. यावेळी राजगोंड पाटील, मोहन पाटील, रावसाहेब खोचगे यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


 

Post a comment

0 Comments