Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला, काँग्रेस आक्रमक


: जिल्हा काँग्रेसच्यावतीने पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक फिरोज पठाण, करीमभाई मेस्त्री, मंगेश चव्हाण, रवींद्र वळवडे उपस्थित होते.


सांगली, (राजेंद्र काळे)
          काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरसला जाताना त्यांच्यावर लाठीहल्ला करणाऱ्या उत्तरप्रदेश पोलिसांचा आणि मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ सरकारचा सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी  मुख्यमंत्री योगी यांच्या  प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी करण्यात आली. निषेधाचे हे आंदोलन होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीच काँग्रेस कमिटीसमोर  मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता परंतु तो झुगारून  कार्यकर्त्यांनी योगी यांच्या पुतळ्याचे दहन केले, तसेच जोडे मारो आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या.
         योगी सरकारचा निषेध करताना श्री पृथ्वीराज पाटील म्हणाले, हाथरस येथे एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात सर्वच बाबतीत अमानुष वागणूक दिली. या महिलेला न्याय मिळावा, आरोपींना फाशी व्हावी  यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरसला सदर तरुणीच्या घरी जात असताना त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष पद्धतीने हल्ला केला. विरोधी नेत्यांचा आवाज दाबण्याचा हा अमानुष प्रयत्न आहे. उत्तर प्रदेश मध्ये सरकार म्हणून काही राहिलेच नाही. या झुंडशाहीचा  आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, असेही ते म्हणाले.
       यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक फिरोज पठाण, करीमभाई मेस्त्री, मंगेश चव्हाण, रवींद्र वळवडे, आदिनाथ मगदूम, विजय आवळे, शितल सदलगे, सनी धोतरे, धनराज सातपुते, आयुब निशाणदार, भाऊसाहेब पवार, पैगंबर शेख, राजेंद्र कांबळे, विलास बेले, नामदेव पठाडे, मुफ्ती कोळेकर, प्रशांत देशमुख, तौफिक फकीर, शुभम बनसोडे, संतोष हाळीमणी, सौरभ काळे, सतीश मोहिते, शीतल लोंढे, नामदेव पटाडे, बलू केगरे,
हे कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारताना काँग्रेस कार्यकर्ते. 
 

Post a Comment

0 Comments