Daily Mahasatta

Daily Mahasatta

जतच्या करजगी पुलावरून ट्रॅक्टर पलटी ; एकजण वाहून गेला

जत ( सोमनिंग कोळी)
         जत तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने थैमान घातले असून तालुक्यातील सर्व पूलावरून पाणी वाहत आहे. यामध्ये नागरिक आपला जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न करीत आहेत. अशीच घटना जत तालुक्यातील करजगी नजीक घडली. बोर नदीला आलेल्या पुरातून ट्रॅक्टर बाहेर काढत असताना झालेल्या दुर्दैवी घटनेत ट्रॅक्टर पलटी होऊन एकजण पुरात वाहून गेला. तर ट्रॅक्टर चालक बचावला आहे, पिंटू धायगुडे वय 28 रा. सनमडी असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे,
        दरम्यान, करजगी, भिवर्गी येथील ग्रामस्थ, उमदी पोलीस सायंकाळी उशिरा प्रयत्न वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत होते. जतच्या करजगी येथील चेन्नई दूध डेअरीसाठी करजगी परिसरातील दुध संकलन करून दुधाचे केन ट्रॅक्टर मधून नेत असताना करजगी-भिवर्गी दरम्यान असणाऱ्या बोर नदीत पूलावर पाणी प्रवाह जास्त असल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाली. सुदैवाने ड्रायव्हर वाचला परंतु ट्रॉली मध्ये बसलेला 28 वय वर्ष असलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. सदरची घटना चित्तथरारक घटना केमेऱ्यात कैद झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून संततधार पावसामुळे जत तालुक्यातील काही गावातील मातीच्या घरांची मोठया प्रमाणात पडझड होऊन नुकसान झालेले आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बागलवाडी सिघनहळी, सोन्याळ येथील घरांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. येथील मंडळ अधिकारी भरत काळे, तलाठी डी. डी. पाटील यांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
.............................

तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस

जत तालुक्यात मे महिन्यापासून आज अखेर झालेला पाऊस पुढील प्रमाणे जत मंडळ २७६मिमी, डफळापूर १७५ मिमी, शेगाव १२३मिमी, कुंभारी १४० मिमी, माडग्याळ १६२मिमी, संख १०१ मिमी, उमदी ९७ मिमी, मुचंडी १०६ मिमी अशी पावसाची नोंद आहे.

Post a Comment

0 Comments