Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतकरी विरोधातील काळा कायदा रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम

सांगली : शेतकरी, कामगार बचाव दिवस आंदोलनात मार्गदर्शन करताना राज्य मंत्री विश्वजीत कदम. यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, शैलजाभाभी पाटील उपस्थित होत्या.

सांगली, ( प्रतिनिधी)
          शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, यापुढेही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा राज्य मंत्री विश्वजीत कदम आणि  विविध संघटनांच्या नेत्यांनी आज येथे दिला.
           केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विरोधातील काळया कायद्याविरुद्ध आज मार्केट यार्डातील गाडीतळावर शेतकरी, कामगार बचाव दिवस आंदोलन केले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन एस यु आय, सेवादल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हमाल, तोलाईदार, आडते, शेतकरी यांचा त्यामध्ये समावेश होता.
         आंदोलनाचे नेतृत्व कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार मोहनशेठ कदम, शहर सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शैलजाभाभी पाटील, काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते आदींनी केले.
          यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात जुलमी कायदा मंजूर केला आहे या कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. खासदारांचा आवाज त्यांनी दाबला आहे. या कायद्या विरुद्ध सरकारमधील चे घटक पक्ष राजीनामा देऊन बाहेर पडलेला आहे त्यामुळे मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिला नाही. देशातला शेतकरी आणि कामगार या काळ या कायद्या काळा कायदा रद्द होईपर्यंत गप्प बसणार नाही आणि भाजपला या देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
       श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले,  शेतकरी व कामगारविरोधी  कायद्यांना कडाडून विरोध करण्यासाठी आजचे धरणे आंदोलन होत आहे. केंद्रात ज्यादिवशी हे कायदे मंजूर झाले तो दिवस शेतकरी आणि कामगारांच्या दृष्टीने काळाकुट्ट दिवस म्हटला पाहिजे. विरोधकांचा आवाज दाबून त्यांनी हे कायदे केले आहेत. संपूर्ण देशभर शेतकरी रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध करीत आहेत. हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
         आंदोलनात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.आंदोलनाला जितेश कदम, नामदेवराव मोहिते, किशोर जामदार, शैलजाभाभी पाटील, मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी, उत्तम साखळकर, सुभाष खोत, वृषाली वाघचौरे, मदिना बरुदवाले, संतोष पाटील, फिरोज पठाण, प्रकाश मुळके, करण जामदार, मनोज सरगर, अमर निंबाळकर, दिलीप पाटील, सुशील गोतपगर, धनराज सातपुते, शेतकरी, हमाल,आडते, तोलाईदार, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------ 


 

Post a Comment

0 Comments