Daily Mahasatta

Daily Mahasatta

अशोका विजयादशमी निमित्ताने रंगले ऑनलाइन धम्म परिवर्तन कविसंमेलन

तासगाव ( प्रतिनिधी )
        रक्ताचा एकही थेंब न सांडता  ‘न भूतो ना भविष्यती’ अशी अद्भुत धम्मक्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  जगामध्ये घडून आणली. या कार्याला उजाळा देण्यासाठी व  अशोका विजयादशमी निमित्ताने  रविवार दिनांक  २५ ऑक्टोबर   २०२०  रोजी दुपारी ३. ३० मिनिटांनी  कवी कट्टा ग्रुप कल्याण - मुंबई यांच्या वतीने कवी नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली गूगल मिट द्वारे ऑनलाइन  धम्म परिवर्तन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
        यावेळी आशा रणखांबे यांनी गाणी सादर करीत  कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले. या कवी संमेलनाचे विशेष म्हणजे  सर्व  सहभागी कवींनी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते.  तर धम्म, सम्राट अशोका विजयादशमी, परिवर्तन,धर्मांतर,  तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  विषयावर  अॅड. प्रज्ञेश सोनावणे, अॅड. श्रीकृष्ण टोबरे, भटू  जगदेव, नवनाथ रणखांबे, अशोक कांबळे,  मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव,  रविकिरण म्हस्के, राष्ट्रपाल काकडे, सुरेखा गायकवाड, अनिल शिंदे, शाम बैसाने, कांतीलाल भडांगे, अशोक डोळस, विनोद गायकवाड यांनी स्वरचित कविता सादर करून प्रबोधन केले. 
         बुद्ध शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा प्रचार आणि प्रसार  करणे या उद्देशाने कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबईची निर्मिती झाली. बौद्ध  धम्म  तत्त्वज्ञान  आणि साहित्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय करता येईल यासाठी  आम्ही प्रयत्नशील आहोत.  त्याचाच एक भाग म्हणून  धम्म परिवर्तन कविसंमेलनाचे  आयोजन  आज अशोका  विजया दशमी  दिनी करण्यात आले. विविध कार्यक्रमाद्वारे आम्ही तथागत गौतम  बुद्ध  आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार  जनमाणसात  पेरत आहोत, असे यावेळी  कविसंमेलनात अध्यक्षीय भाषणात नवनाथ रणखांबे यांनी मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments