Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे जमीनीची नोंदणी; जमीनमालक, तलाठ्यावर गुन्हा


कुपवाड (प्रमोद अथणीकर)

            यशवंतनगर येथील मल्लीकार्जून देवस्थानाच्या जमिनीवरील देवस्थानाच्या नावाची नोंद कमी करून बनावट कागदपत्राच्या आधारे गावदफ्तरी नोंदी केल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला. याप्रकरणी संगनमत करून नोंदी केल्याप्रकरणी जमीनमालक संजय मधूकर स्वामी (रा. यशवंतनगर) व कमलाकर आनंदराव कदम (तलाठी कुपवाड) यांच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
     शहरातील यशवंतनगर येथे चिन्मय पार्कजवळ मल्लीकार्जून देवस्थानची जमीन आहे. ही जमीन सुमारे एक एकरच्या जवळपास असल्याची माहिती पोलीसाकडून मिळाली आहे. या जमीनीवर कुपवाड तलाठी कार्यालयामध्ये २४ आॅगष्ट २०२० पुर्वी संगनमत करून जमीनमालक संजय मधुकर स्वामी यांनी १५जून १९९८ च्या महसूल ज्ञापनामध्ये खाडाखोड करून देवस्थानाच्या नावाची नोंद कमी करून घेतली. तसेच शासनाचे फसवणूक करून व आस्तीत्वात नसलेले फेरफार नंबर ४२४२७चे सर्व कागदपत्रे तथाकथीत तयार करून शासनाच्या देवस्थानची फसवणूक झालेली आहे.
     फेरफार नंबर ४२३९८ हा फेरफार करतेवेळी मुळ आदेशाचे फेरफार क्रमांक १२९०५ येथे करणेत आलेले नोंदीबाबत पडताळणी करणे आवश्यक होते. परंतू तसे न करता खाडाखोड करून बोगस कागदपत्रे सादर झालेली आहेत. तलाठी कमलाकर कदम यांनी आस्तित्वात नसलेल्या कागदपत्राच्या आधारे गावदफ्तरी फेरफार नंबर ४२३९८ व ४२४२७ च्या नोंदी केलेल्या आहेत. याप्रकरणी तलाठी रमेश कावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय स्वामी व तलाठी कमलाकर कदम यांच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


 

Post a Comment

0 Comments