Daily Mahasatta

Daily Mahasatta

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

इस्लामपूर( सूर्यकांत शिंदे)
       राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाटा येथे इंदिरा पॅलेस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. बुधवार रात्री साडे अकरा वाजता अपघात झाला. रफिक इब्राहीम मुल्ला व सुरज संभाजी जाधव( दोघे रा. विठ्ठलवाडी ता. वाळवा ) अशी मृतांची नावे आहेत.
         याबाबत फिरोज अब्दुल मुल्ला यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मुल्ला व जाधव दोघे मोटारसायकल बजाज पल्सर ( एमएच १० ए यु ७३१८ ) वरून रात्री साडे अकराच्या सुमारास जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवून गंभीर जखमी केले. या धडकेत या दोघांच्या डोक्याला ,छातीला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्राव होवून दोघेही मृत झाले. उपजिल्हा रुग्णालयात दोघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
          याबाबत पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments