Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतकऱ्याकडून १८ लाखांचा गांजा जप्त


: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई


जत ( सोमनिंग कोळी)
    जत तालुक्यातील उमराणी गावाच्या शिवारात मल्लप्पा इरगोंडा बिराजदार या शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 17 लाख 76 हजार रुपयांचा गांजा साठा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडला आहे. एलसीबी पोलिसांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा मारला. बिराजदार या शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतात गांजा ची लागवड केली होती. पोलिसांनी छापा मारल्यानंतर मल्लप्पा इरगोंडा बिराजदार या शेतकऱ्याला ताब्यात घेवून जत पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
    पोलीस अधीक्षक श्री. दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दूबुले यांनी सांगली जिल्ह्यात गांजाची लागवड करणाऱ्या व गांजा विक्री करणारे इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी गांजाची लागवड करणाऱ्या व गांजा विक्री इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी खास पथक तयार केले आहेत.
    आज दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी जत तालुक्यामध्ये पोलीस निरीक्षक अभिजीत सावंत ,पोलीस अच्युत सूर्यवंशी, राजेंद्र मुळे, जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, महादेव धुमाळ, सचिन कुंभार, राहुल जाधव ,प्रशांत माळी यांनी गुप्त माहितीच्या आधारे गांजाची लागवड करणाऱ्या व गांजा विक्री करणारे इसमाची माहिती मिळाली होती.
    उमराणी येथील मल्लाप्पा इरगोंडा बिराजदार यांनी उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती.पोलिसांनी बिराजदार यांचे उसाचे शेतात छापा मारले असता उसाच्या शेतात 147 किलो वजनाचा किंमत रुपये 17 लाख 76 हजार रुपयाचा ओला गांजाची झाडे मिळाली. हा संपूर्ण साठा आता पोलिसांनी जप्त केला आहे. पंचनामे सहित गांजा जप्त करून आरोपी पुढील तपास कामी जत पोलीस ठाणे येथे देण्यात आला आहे.


 

Post a Comment

0 Comments