Daily Mahasatta

Daily Mahasatta

सावधान: वाझर बंधारा गेला पाण्याखाली

पलुस (अमर मुल्ला)
      येरळा नदीवर वाझर येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ३० वर्षापूर्वी बांधण्यात आला आहे. परंतु तीस वर्षांपासून कधीही हा पूल पाण्याखाली गेला नाही. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे बर्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. महापूर ही आ‌ला होता. परंतु वाझर पूल मात्र पाण्याखाली गेला नाही. पलूस व खानापूर या दोन तालुक्यांना जोडणारा आंधळी, वाझर बंधारा दोन दिवसांपासून चालू असलेल्या परतीच्या पावसाने पाण्याखाली गेला आहे.
        नदी दुतर्फा वाहत असून पुलावर साधारणतः एक फुटांपेक्षा जास्त पाणी वाहत आहे. बंधारा बांधकाम झाल्यापासून पहिल्यांदाच या पूलाने धोक्याची पातळी ओलांडली आहे . त्यामुळे परिसरातील व या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र परत जावे लागत आहे. नदीवरील पूलावरून पाणी जात आहे समजताच आज दिवसभरात आसपासच्या परिसरातील नागरिकांनी पाणी व पुल पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहेत . बंधारा बांधकाम झाल्यापासून पहिल्यांदाच या पूलावरून पाणी वाहत आहे अशी यावेळी पूरपरिस्थिती बंधारा पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांची चर्चा सुरू आहे.
बंधारा व पाणी पाहण्यासाठी तर ग्रामस्थ व परिसरातील लोक येत आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभव आला तो नैसर्गिक जलमय वातावरण पाहणारे थोडेच आपला जीव धोक्यात घालून अनेक मुले, मुली तसेच नागरिक सेल्फी काढण्यासाठी नदीवरील धोकादायक पुलावर जाऊन मृत्यू ला आमंत्रण देत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते. तसे न करता लोकांनी सर्तकता बाळगावी. नदीकाठावरील लोकांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. 

Post a Comment

0 Comments