योगी सरकार विरोधात सांगलीत काँग्रेसचा सत्याग्रह

सांगली : जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, महिला आघाडीच्या शैलजाभाभी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

: हाथरसमधील पीडित तरुणी व कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
सांगली, (राजेंद्र काळे)
        हाथरस येथील एकोणिस वर्षाच्या दलित तरुणीवर अत्याचार झालेला असताना उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ सरकारने जो निर्दयीपणा आणि निर्लज्जपणा दाखवला त्याविरोधात आज सांगली जिल्हा काँग्रेसच्यावतीने  स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
       या सत्याग्रह आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, महिला आघाडीच्या शैलजाभाभी पाटील, हे प्रामुख्याने सहभागी झाले होते.
      पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित समाजातील एकोणीस वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा अनन्वित छळ करण्यात आला. या घॄणास्पद घटनेने अख्खा देश हादरला आहे. गुन्हेगार व भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने केलेल्या कृत्याने सर्वांना शरमेने मान खाली घालायला लावली आहे. पीडितेला जिवंत असताना तर प्रचंड यातना देण्यात आल्याच, परंतु मृत्यूनंतरही तिची प्रचंड अवहेलना करण्यात आली. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा हक्कही निर्दयी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबाला दिला नाही. मध्यरात्री पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार उरकून टाकले.
         उत्तर प्रदेश सरकारचा उद्धटपणा येथेच थांबला नाही तर पिडीत कुटुंबाला, विरोधी पक्षाच्या नेत्यांना व प्रसार माध्यमांचा भेटू दिले नाही. हाथरस या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पीडित कुटुंबाच्या घराजवळ शेकडो पोलिस तैनात करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने या सर्वांवर कळस करत अत्यंत निर्दयी व निर्लज्जपणा दाखवला आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांच्याशी अत्यंत हीन पातळीवरचे व्यवहार करून अटक केली आहे. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर बेछूट लाठीमार करण्यात आला आहे.
        योगी आदित्यनाथ सरकारच्या या मनमानी व असंवैधानिक कृत्याविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करीत आहे. तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहे. हाथरसमधील या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
       आजच्या या सत्याग्रहात युवा नेते नगरसेवक  मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, मदिना बारूदवाले, वृषाली वाघचौरे, बिपिन कदम, नंदू शेळके, आदिनाथ मगदूम, अविराजे शिंदे, विजय आवळे, डॉ.नामदेव कस्तुरे, तौफिक शिकलगार, सनी धोतरे, आयुब निशाणदार, भाऊसाहेब पवार, अमित पारेकर, पैगंबर शेख, मौलाली वंटमोरे, अल्बर्ट सावर्डेकर, बाबगोंडा पाटील, मनोज नांद्रेकर, नामदेव पठाडे, तोहीद फकीर, मंदार काटकर, ताजुद्दीन शेख, प्रसाद पाटील, लालू मेस्त्री, संतोष भोसले, महावीर पाटील, सुशांत गवळी, हेमंत पाटील, विनायक कोळेकर, शीतल सदलगे,नितीन चव्हाण, आयुब पटेल, आशिष चौधरी, पवन महाजन, सुरेश कांबळे, चैतन्य पाटील, आकाश तिवडे, वसंतराव कोळी, किरण माने, महेश साळुंखे, अल्ताफ नदाफ हेही सहभागी झाले होते.
------------------ 


 

Post a comment

0 Comments