सांगली (प्रतिनिधी)
मुलगी झाली याच्या नैराश्यातून आईनेच काही तासात नवजात मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सांगली येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३० रा. येलापूर, जि. बेळगाव) या महिलेविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, सुमित्रा हिला प्रसुतीसाठी सांगली सीव्हील हाॅस्पीटल मध्ये दाखल केले होते. तिला मुलगी झाल्याने ती नाराज होती. या नैराश्यातूनच तिने शनिवार रात्री अवघ्या ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या आपल्याच पोटच्या बाळाचा गळा आवळला. सुमित्रा ने मुलीचा गळा आवळल्याची माहिती हाॅस्पीटल मधील एका महिलेने डॉक्टरना दिली. त्यानंतर परिचारिका उपचारासाठी मुलीला घेण्यासाठी गेल्या त्या वेळी मुलीच्या गळ्यावर व्रण आढळून आले. नंतर मुलीवर उपचार सुरू करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना रविवारी रात्री मुलीचा मृत्यु झाला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सुमित्रा जुट्टी हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments