Daily Mahasatta

Daily Mahasatta

बलवडी ( खा .) गावात ९ तर विट्यात ८ पॉझिटिव्ह

: खानापूर तालुक्यात एकूण २६ रुग्ण सापडले

विटा ( मनोज देवकर )
       खानापूर तालुक्यात आज २६ जणांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. त्यात बलवडी (खानापूर) गावात ९ जणांचा समावेश आहे. भिकवडी बुद्रुक मध्ये एक , हिंगणगादेत दोन , घानवड मध्ये दोन रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. विटा शहरात कालच्या पेक्षा कमी म्हणजे ८ लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. लेंगरे व आळसंद मध्ये एक, चिंचणी मध्ये दोन रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या.
        आज अखेर खानापूर तालुक्यातील रुग्णसंख्या १९१७ वर पोहचली असून सद्या फक्त ५४६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत . आजवर १३१८ रुग्ण बरे झाले आहेत.

Post a Comment

0 Comments