Daily Mahasatta

Daily Mahasatta

अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई (प्रतिनिधी) 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसापासून अमित ठाकरे यांना ताप येत होता. त्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोरोना चाचणी तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. हा ताप व्हायरल असण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.  

Post a Comment

0 Comments