Daily Mahasatta

Daily Mahasatta

अल्पवयीन बहिणीवर भावाचा बलात्कार , आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

आरोपी : तौफिक उर्फ अमिनुल्ला सलीम मुल्ला

सांगली प्रतिनिधी

      भाळवणी ता. खानापूर येथे तेरा वर्षांच्या  अल्पवयीन सावत्र बहिणीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमास वीस वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड,  दंड न दिल्यास एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तौफिक उर्फ अमिनुल्ला सलीम मुल्ला ( वय २४ रा. भाळवणी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत फेब्रुवारी २०१९ मध्ये विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

       याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी तौफिक आणि तेरा वर्षांची पिडीत मुलगी नात्याने सावत्र बहिण भाऊ आहेत. त्यामुळे ते भाळवणी  येथे एकाच घरात राहत होते. मुलगी अल्पवयीन असल्याने तसेच सावत्र बहिण असल्याने  विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपी तौफिक यांने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आणि याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती.

       सततच्या लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन पिडीत मुलगी गर्भवती झाली. पालकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी पिडीतेला सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतु या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने पोलिसांना देण्यात आली. या नंतर पोलीस आरोपी विरोधात आरोपी तौफिक मुल्ला याच्या विरोधात फेब्रुवारी २०१९ मध्ये  रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला.

      विटा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ तसेच सद्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, हावलदार उत्तम ओंबासे, श्री राडे, श्री डांगे यांनी  आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करून कोर्टात दाखल केले.  या पुराव्याच्या आधारे आरोपी तौफिक उर्फ अमिनुल्ला सलीम  मुल्ला रा. भाळवणी यास अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षाची सक्तमजुरी व रक्कम रुपये १० हजार दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. 

  

Post a Comment

0 Comments