Daily Mahasatta

Daily Mahasatta

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयास आदर्श कृतीशील शाळा पुरस्कार

पलूस ( अमर मुल्ला)
        येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयास महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यावतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श कृतीशील शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रविवारी भिलवडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत, चितळे उद्योग समूहाचे मा. गिरीश चितळे, सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका मा. मन्वाचार मॅडम,उपमुख्याध्यापक मा.कुलकर्णी सर, सर्व मान्यवर यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक मा. टी. जे. करांडे सर, जेष््ठ शिक्षक श्री.  ए. जे. सावंत सर, विकास कांबळे सर यांनी पुरस्कार स्वीकारला. सन 2020 - 21 या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवात कृतीशील शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
      संस्थेचे अध्यक्ष मा. उदय परांजपे साहेब ,उपाध्यक्ष मा. सुनील रावळ, सचिव मा. जयंतीलाल शहा , संचालक मा. विश्वास रावळ, सर्व संचालक यांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments