Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात नऊ लाखांचा गुटखा जप्त

: कुरळप पोलिसांची मोठी कारवाई ; एका महिन्यात गुटखा पकडण्याची ही दुसरी धडक कारवाई

पेठ (रियाज मुल्ला)
         वाळवा तालुक्यातील येलूर फाट्यावर आज बुधवार सकाळी बोलेरो पिकअप क्र MH09 FL 1359 गाडीतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे गोपिनीय माहिती मिळाली असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरळप पोलीस स्टाफने राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर साफळा लावला होता. दुपारी 11ते 12 वाजण्याच्या दरम्यान ही गाडी फाट्यावर येताच पथकांनी गाडी थांबवून चौकशी केलीअसता चालक सुरेश गंगाधर मतवाडे रा. रेंदाळ जिल्हा कोल्हापूर हा संशयित वाटल्याने गाडीची तपासणी केली असता हौद्यामध्ये पुढील बाजूस जनावरांचा गहू, भुश्याची पोती ठेवून आतील बाजूस 9 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.
         अधिक चौकशी केली असता हा माल निपाणी वरून सातारा येथील व्यापाऱ्याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. यामुळे सहा लाख पन्नास हजार किमतीची बोलेरो पिकअप गाडी व 9 लाख रुपयाचा गुटखा असा ऐकून 15 लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन मध्ये आणून चालक सुरेश गंगाधर मतवारे व त्याचा साथीदार संदेश सदाशिव माळी रा. हुपरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये पो. ना. अनिल पाटील पो. ना. सूर्यकांत कुंभार, पो को. फत्तेशिंग पाटील पो. को. दीपक शिंदे., डी बी पथकाचे सचिन मोरे यानी सहभाग घेतला तर पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे करत आहेत. आठ दिवसापूर्वी सांगली जिल्हा अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यानी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध धंदे , खाजगी सावकारकी, मटका बुक्की यांच्यावर करडी नजर ठेवण्याची सूचना दिल्या होत्या. त्या नुसार या चार दिवसात कुरळप पोलीस स्टेशनची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

Post a Comment

0 Comments