Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत चक्क ' डांबरी ' रस्त्यावर बोटींग...

सांगली : मार्केट यार्ड चौकात साचलेल्या पाण्याच्या तळ्यात खरी खुरी नाव ठेऊन दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
         सांगलीतील मार्केट यार्ड चौकात साठलेल्या पाण्यामध्ये  दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेकडून खरीखुरी नाव सोडून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. जर येत्या दोन दिवसात याठिकाणी साचलेल्या घाण पाण्याचा निचरा केला नाही तर मात्र  तीव्र लढा उभारू असा इशारा यावेळी  आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
        सांगली शहर व उपनगरांमध्ये मागील आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था कुचकामी ठरल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. सांगलीच्या मार्केट यार्ड चौकात तर  पाण्यामुळे  तळे साचले आहेत. याबाबत अनेकदा बांधकाम विभागास कळवून सुद्धा ठोस कारवाई केली जात नव्हती. यामुळे या गंभीर प्रकाराकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाचे उत्तम मोहिते, अन्याय निर्मूलन संघटनेचे धर्माआबा कोळी, नीतू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी असे नावाडी आंदोलन करण्यात आले.
      सांगली मार्केट यार्ड चौकातील रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या तळ्यात खरी खुरी नाव  
ठेऊन आंदोलन करण्यात आले.  एकीकडे महापालिका रस्त्यावरील पाणी काढू शकत नाही आणि खड्डे  मुजवू शकत नाही तर दुसरीकडे कोट्यवधींची इमारत उभी करण्याचा प्लॅन करीत आहे. खरंतर गेली 20 वर्षे महापालिकेचा कारभार केवळ कागदावरचाच  झाला आहे. आजमितीस त्यांना कागद ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने नव्या इमारतीचा घाट घातला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच  मनपाच्या बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे त्यांना जागे करण्यासाठी आणि आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी आज नावाडी आंदोलन केले आहे. जर दोन दिवसात पाण्याचा निचरा झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा उत्तम मोहिते, धर्माआबा कोळी यांनी दिला आहे. 


 

Post a Comment

0 Comments