Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम उत्कृष्ट

पेठ(रियाज मुल्ला)
       पेठ ता वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोविड हद्दपारीचे काम विशेषतः गृह विलगिकरन(होम आयसोलेशन)अतिशय उत्कृष्ट असून त्यासंदर्भात विविध कोविड रुग्ण समाधानी असलेचे सांगण्यात येत आहे.
        प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या आरोग्यधिकारी डॉ.वैशाली देवापुरे , डॉ अर्चना कोडग, आरोग्यसेविका उपाध्ये मॅडम, आरोग्यसेवक आशिष पाटील व त्यांची सर्व टीम, शुभांगी सावंत अन त्याच्या आशा सेविकांची टीम, दीपाली कुंभार , प्रतिभा यादव हे सर्वच जण अतिशय तन्मयतेने काम करत असून रुग्णाना भेट देण्यासाठी सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत ही टीम नेहमीच तत्पर असते.
         गोळेवाडी विष्णूनगर, अभियंतानगर, पेठ, कापूरवाडी नेर्ले हद्द येथील विविध परिसरातील मळ्यात ,रानातील वस्तीवर जातात .पण यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहिल्यानंतर रुग्णाला आपलेच कोणीतरी माहेरचे आल्यासारखे समाधान वाटते. रुग्णांना औषध सोबत धीर देण्याचं मोठं कार्य हि टीम हसत खेळत देत असते.या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ अर्चना कोडग व डॉ वैशाली देवापुरे या दोघी व त्यांची टीम जणू ही कोविड लढाई आपण जिंकलीच पाहिजे या जिद्दीने काम करत आहेत.
         रुग्णाने जरी रात्री अपरात्री फोन केला तर त्याला धीर देत त्याला औषधोपचार करतात. त्यांची इतरही टीम अगदी तशीच उत्साही व रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. आरोग्यसेविका उपाध्ये, श्री पाटील व इतर टीम मळे ,वाडी वस्त्या,गाव कच्चेपक्के रस्ते तुडवत रात्रं-दिवस झटत आहे.या सर्वाचा विचार करता तालुक्यात व जिल्ह्यातील अशा हाडाच्या सेवकांचा प्रशासनाने विचार करून त्यांना पुरस्कार व बक्षीस देऊन त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यावी व मृत्युदर घटवणाऱ्या या देवदूतांचा सन्मान करावा अशी मागणी आता नागरिकांच्यातुन होत आहे .

Post a Comment

0 Comments