Daily Mahasatta

Daily Mahasatta

अचकनहळळी जवळ बोअरवेल्सगाडी अडवून ५० हजार लुटले

: पाच जणावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल

जत ( सोमनिंग कोळी)
          जत तालुक्यातील अचकनहळळी पासून मंगळवेढा कडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री जत येथीलच पाच जणांच्या टोळीने बोअरवेल्स गाडी अडवून चालकाला मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम दोन मोबाईल हँडसेट लुटल्या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी चार आरोपींना अटक केली असून त्यांना सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
       अधिक माहिती अशी, जतहुन मंगळवेढा कडे रविवारी रात्री पाच बोअरवेल च्या गाड्या निघाल्या होत्या. त्यातील पुढे असणार्‍या एका गाडीसमोर आरोपी लखन पाथरूड, निलेश सुखदेव घोडके, सागर अंबादास साळे, रवींद्र प्रकाश मोरे व एक अज्ञात व्यक्ती या पाच जणांनी काळी पिवळी गाडी क्रमांक एम एच दहा डब्ल्यू 9459 ही गाडी लावून चालकाला बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीनंतर त्यांनी चालकाकडील दोन मोबाईल व रोख 50 हजार रुपये घेऊन पोबारा केला होता.
          या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपींना काळी पिवळी जीप सह अटक केली. यातील चार जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले तर एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी या आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच जीप गाडी जप्त केली आहे. सोमवारी न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कपिल शामराव गजभिये रा. बडनेरा जि. अमरावती यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments