Daily Mahasatta

Daily Mahasatta

थकीत ऊस बिलांसाठी केन अ‍ॅग्रो कारखान्यावर शेतकऱ्यांचा ' ठिय्या '

केन अॅग्रो साखर कारखान्याच्या गेटवर चुली पेटवून ठिय्या आंदोलन करताना युवा नेते राजुशेठ जानकर, सागर लोखंडे व शेतकरी बांधव.
विटा (मनोज देवकर)
    सन 2018 -19 आणि सन 2019 - 20 या गळीत हंगामातील केन अ‍ॅग्रो रायगाव या कारखान्याकडील शेतकऱ्याची थकीत ऊस बिले तातडीने मिळावीत या प्रमुख मागणीसाठी खानापूर तालुक्यातील गावठाण भेंडवडे, साळशिंगे येथील शेतकऱ्यांनी केन अ‍ॅग्रो कारखान्यावर बुधवार ता. २१ रोजी  जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
        सन 2018 - 19 आणि सन 2019 - 20 या गळीत हंगामातील केन अ‍ॅग्रो रायगाव या कारखान्याकडून गेल्या दोन वर्षापासून वारंवार मागणी करुनसुद्धा ऊस बिले मिळालेली नाहीत. ऊस बिले न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे थकीत ऊस बिले मिळावीत या प्रमुख मागणीसाठी राजूशेठ जानकर, सागर लोखंडे, ताई घार्गे, रुक्मिणी जाधव, कृष्णा पाटील, सुरेश देसाई, भगवान जानकर, सूर्यकांत जानकर, हणमंत घोडके, जगन्नाथ जानकर, अशोक जानकर, लक्ष्मण मोटे, शिवाजी जानकर, सुरज जानकर, नवनाथ जानकर, दादासो जाधव, सुखदेव जानकर, संतोष जगदाळे, दत्तात्रय लोखंडे, तानाजी जानकर, विजय जानकर, सीताराम जानकर, उत्तम जानकर, शंकर दळवी, आण्णासो जानकर, दशरथ जानकर, राहिमखान जमादार, विठ्ठलशेठ जानकर, हमजान शिकलगार, रुक्मिणी जाधव, विलास पाटील, नानासो जानकर, मुरलीधर जानकर, शिवाजी यादव, चंद्रकांत यादव, तुकाराम जानकर, महादेव जानकर, हिंदुराव जानकर, सयाजी माने, रेवन जाधव यांच्यासह शेतकर्यांनी ठिय्या मारला आहे.
.................................
तुमच्या बुडाखाली
अंधार आहे त्याचे काय ?
भाजपा चे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार पृथ्वीराज देशमुख फिरत आहेत. गेली तीन वर्षे देशमुखांच्या केन ऍग्रो   साखर कारखाना प्रशासनाने भेंडवडे परिसरातील शेतकऱ्यांची देणी दिलेली नाहीत.  अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. तुम्ही सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी म्हणून फिरत आहात. पण दरेकर साहेब, तुमच्या बुडाखाली अंधार आहे त्याचं काय ? असा संतप्त सवाल भेंडवडे चे युवा नेते राजू जानकर यांनी विचारला आहे. 


 

Post a Comment

0 Comments