Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वाळवा तालुक्यात सुमारे १४ लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

इस्लामपूर .( सूर्यकांत शिंदे  ) 
    पेठ आणि तांदुळवाडी ता. तालुका वाळवा येथे सोमवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे १४ लाख रुपये किमतीचा १७० किलो गांजा व मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सुदाम काकासो बाबर (वय ५० रा. पेठ. ता. वाळवा) व संतोष संभाजी तोडकर (वय ४२ रा. तांदुळवाडी ता. वाळवा) दोघाना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली.
         तालुक्यात प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात गांजा  सापडल्याने खळबळ माजली आहे. पोलीस नाईक उत्तम तुकाराम माळी यांनी फिर्याद दिली आहे. पेठ आणि तांदुळवाडी येथे छुप्या पध्दतीने गांजाची विक्री होत असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता दोघांकडे तब्बल १७० किलो वजनाचा गांजा मिळून आला. पेठ येथील सुदाम बाबरच्या राहत्या घरी पोलिसांनी सोमवारी रात्री १०.४५ वाजता छापा टाकला. तेथे बेकायदेशीर रित्या ४ किलो ५० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत ३२ हजार इतकी आहे. तांदुळवाडी येथील तर संतोष संभाजी तोडकर याच्या  घरी रात्री १२. ३० वाजता छापा टाकला. यावेळी संतोष याच्या भावाच्या म्हणजे अमोल तोडकरच्या घरी १३ लाख २८ हजार आठशे ऐंशी  इतक्या किमतीचा १६६ किलो ११ ग्रॅम गांजा मिळून आला. दोन्ही ठिकाणी एकत्रित १० पोती मिळून आली. दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक इसाक चौगुले, पोलीस हवालदार दिपक ठोंबरे, पोलीस नाईक, शरद जाधव, उत्तम माळी, अरुण पाटील, प्रशांत देसाई, मीनाक्षी माळी, सचिन सुतार, उमेश राजगेयांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत. 


 

Post a Comment

0 Comments