Daily Mahasatta

Daily Mahasatta

बहिणीला सोन्याची अंगठी दिली म्हणून मुलाकडून बापाचा खूनजत (सोमनिंग कोळी )

        जत तालुक्यातील बिळूर येथे 80 वर्षे वयाच्या  वडिलांचा पोटच्या मुलानेच दगडाने गंभीर जखमी करून खून केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. भीमू सत्यप्पा जाबगोंड असे मयत वृद्धाचे नाव आहे. तर संशयित आरोपी मुलगा सदाशिव भिमु जाबगोंड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

      अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील बिळूर येथील भीमू जाबगोंड यांच्या डोकीला दिनांक पाच ऑक्टोबर रोजी गंभीर मार लागला होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु डोक्याला जबर मार असल्याने त्यांना दिनांक 6 रोजी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना 7 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर शवविच्छेदन आहवाल भीमू जाधव यांना फिट येत असल्याने डोक्यावर पडून झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

        दरम्यान याप्रकरणी मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जखमी करून मारले असल्याची फिर्याद महानंदा राजेंद्र कोरे राहणार बेडग ता. मिरज यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे वडिलांनी मला सोन्याच्या अंगठ्या दिल्याने संशयित आरोपी सदाशिव जाबगोंड यांनी त्यांच्याशी दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी भांडण काढले. या भांडणात त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाल्याने आणि अतिरक्तस्त्रव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मुलाने त्यांचा खून केल्याची फिर्याद महानंदा कोरे यांनी दिली आहे. याप्रकरणी दिनांक 9 रोजी जत पोलिसात आरोपी सदाशिव भीमु जाबगोंड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments