Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना नंतर उद्भवणार्या आरोग्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना

: डॉ अभिजीत अंकुश निकम यांचे मार्गदर्शन

सांगली (राजेंद्र काळे)
       आतापर्यंत भारतामध्ये लाखो  लोकांनी व सांगली जिल्ह्यामध्ये हजारो लोकांनी कोविड वर मात केली  आहे. योग्य वेळी निदान, लवकर औषधोपचार तसेच सकारात्मक विचार या बळावर  लोकांनी कोरोना  वर विजय मिळवला आहे. या कोरोनावर  विजय मिळवल्यानंतर खरी लढाई सुरू होते ती  पूर्ववत आयुष्य जगण्याची, पुढे नव्या उमेदीने उभा राहण्याची. म्हणून यामध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहे...
  
      : यामध्ये खरंतर दोन प्रकार पडतात
1) सौम्य लक्षण असलेले रुग्ण ज्यांनी घ्यावयाची काळजी
2) व्हेंटिलेटरवर वरून आलेले जे तीव्र लक्षणे चे रुग्ण आहेत त्यांनी घ्यावयाची काळजी...

1) सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होणारे त्रास किंवा घ्यावयाची काळजी या विषयी आपण बघू...
आपण कोरोना मुक्त झालो म्हणजे गाफील राहून चालणार नाही स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. पूर्ण मुक्त झाल्यानंतर सुद्धा बर्‍याच जणांना थोडा खोकला,  अशक्तपणा,  शरीरातील ताकद कमी होणे थोडासा श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे जाणू शकतात. अशा रुग्णांनी आहारामध्ये आणि व्यायाम मध्ये बदल केले पाहिजेत. ज्यांना अशक्तपणा आहे अशा लोकांनी आहारामध्ये खजूर त्याच्यापासून बनवलेला खर्जुरादी मंथ. आठवड्यातून दोन-तीन वेळा अंड्या पासून बनवलेले आमलेट व  आठवड्यातून एक ते दोन वेळा मांसरस म्हणजे चिकन सूप किंवा मटण सूप त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधे घेणे क्रमप्राप्त आहे. औषधे प्रत्येक व्यक्तीच्या लक्षणानुसार बदलतात. पण यामध्ये संशमनी वटी व व च्यवनप्राश ही महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर अजून औषधे असतात जी व्यक्ती व प्रकृती नुसार बदलतात. जी जवळच्या वैद्याला विचारावित.
         आहारामध्ये बदल केल्यानंतर व्यायाम ही तितकाच महत्त्वाचा आहे. पण व्यायाम लगेच चालू करू नये व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. व्यायाम मध्ये शक्यतो हलके व्यायाम करावे यामध्ये सुरुवातीला खांदे पुढे मागे फिरवावे. उभा राहून डाव्या उजव्या बाजूस थोडंसं वाकावं, पाय गुडघ्यात वाकून उचलण्याचा प्रयत्न करावा असे वॉर्म अप  सारखे व्यायाम करावेत. वॉर्मअप झाल्यानंतर शक्यतो थोडसं चालावं. सपाट जमीन असेल अशा ठिकाणी चालत राहावे. हळूहळू चालण्याचा वेग व अंतर वाढवावे पहिले 7-8 दिवस एकदम जास्त प्रमाणात चालू नये त्यानंतर हळूहळू अंतर वाढवत जावे. कोविड मध्ये बरेच वेळा फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असते अशावेळी कार्यक्षमता वाढण्यासाठी वरील व्यायाम तसेच थोडासा ब्रेथिंग  एक्झरसाइज,  प्राणायाम, शॉर्ट ब्रिस्क  वॉकिंग हे करणं महत्वाचं आहे...

  2) आता आपण तीव्र लक्षणे असलेल्या रूग्णामध्ये तसेच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर राहून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या बद्दल माहिती घेऊ. अशा रुग्णांमध्ये फुफ्फुसांची हानी  होण्याचे प्रमाण जास्त असते. या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यात अडचण होणे यासारखे त्रास वाटू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोविड 19 मुक्त झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यात अडचण निर्माण होणे आणि आजारामुळे शरीरातील ताकद कमी होणे साहजिक आहे. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. असे रुग्ण कोरोना  मुक्त झालेले आहेत पण त्रास होत आहे आणि spo2 जर चांगला राहत आहे तर त्यांनी खालील प्रमाणे क्रिया कराव्यात 
1.झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. डोकं आणि मानेला आधारासाठी डोक्याखाली उशी घ्यावी. पाय गुडघ्यातून थोडे दाबून घ्यावे.
2. खुर्चीवर बसल्यावर त्रास झाल्यास थोडं पुढं वाकावे,  हात मांडीवर ठेवावेत..
3. एका ठिकाणी शांत बसावं; एक हात छातीवर व दुसरा हात  पोटावर ठेवून डोळे बंद करून शांत बसावं. हळुवार नाकाने श्वास घ्यावा तोंडाने सोडावा. नाकाने श्वास घेण्यात अडथळा होत असल्यास तोंडाने श्‍वास घ्यावा शक्यतो हळुवार घेण्याचा प्रयत्न करावा गडबड करू नये...         
    रुग्णालयातून घरी गेल्यानंतर वरील सांगितलेले व्यायाम व प्राणायाम करावे त्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते व मानसिक ताण कमी होतो,आत्मविश्वास वाढतो.  व्यायाम करताना त्रास झाल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधावा. नियमित श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, योग करावेत...
       जेवताना गरम पाणी प्यावे पौष्टिक आहार घ्यावा. ऑक्सिजनची पातळी रोज चेक करत राहावी. बऱ्याच वेळा काही लोकांना व्यायामाचा ताण सहन होत नाही तसेच झोप लागत नाही  शरीरातील स्नायूंची हानी होते तसेच मानसिक ताण, चिंता,  डिप्रेशन,  सतत भीती वाटत राहणे, बैचैनी  होणे मनात वेगवेगळे विचार येणे, समाज काय म्हणेल समाजाबद्दल विचार येणे,  कधीकधी समाजाबद्दल राग येणे असं होऊ शकतं त्यामुळे शारीरिक आरोग्याप्रमाणे  मानसिक आरोग्याकडे रुग्णांनी लक्ष द्यावे . त्यामुळे रुग्णांनी प्राणायाम, मेडिटेशन याकडे लक्ष द्यावे व सकारात्मक विचार करावा. मन सकारात्मक राहण्यासाठी सकारात्मक विचार करावा,  सकारात्मक विचार ऐकावेत. संगीत, गाणी, पुस्तक वाचणे, सकारात्मक विचार असणार्‍या लोकांशी बोलणे मित्रांशी बोलणे हे  अमलात आणावे. सरतेशेवटी कोरोना मुक्त झाल्यानंतर सकारात्मक विचार, पौष्टीक आहार, प्राणायाम, चालणे, सोपे योग व वर सांगीतलेले देशी कोंबडीच्या चिकनचे सुप, मटण सुप, देशी अंड्याचे ऑम्लेट, खर्जुरादी मंथ यांचा आहारात समावेश व आयुर्वेदिक उपचार जी    फप्फुसांची  झालेली हानी भरून काढेल ही पध्दत  वापरली तर यातून पूर्णपणे मुक्त व्हाल. पन्नास टक्के लोकांना यातल्या काहीच गोष्टीची गरज पडते.

©डॉ अभिजीत अंकुश निकम
श्री सिद्दामृत आयुर्वेद हॉस्पिटल, विटा..
9960495989.. 


Post a Comment

0 Comments