Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलूसच्या समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र व डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलचे मंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते उद्घाटन


पलूस : येथील कोव्हिड आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करताना मंत्री विश्वजित कदम. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी, अरुणअण्णा लाड, महेंद्र आप्पा लाड उपस्थित होते.

पलूस ( अमर मुल्ला )
         येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहात पलूस येथील तज्ञ डॉक्टर्स आणि प्रशासन यांच्या मदतीने सुसज्ज १०० बेडचे समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र (स: शुल्क) सुरू करण्यात आले. या कोव्हीड केंद्राचे उद्घाटन राज्य मंत्री विश्वजीत कदम यांच्याहस्ते करण्यात आले.
         पलूस तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे पलूस शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या मदतीने निर्माण केलेल्या अद्ययावत हॉस्पिटलचे माननीय राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी माननीय डॉ अभिजित चौधरी, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख श्री अरुण अण्णा लाड, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड, डीवायएसपी शेंडगे मॅडम, तहसीलदार राजेंद्र पोळ, बीडीओ स्मिता पाटील, पलूस नगरपरिषदचे मुख्याधिकारी सुमित जाधव, वैद्यकीय अधीक्षक अधिक पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रागिणी पवार मॅडम व पलूस पोलीस निरीक्षक विकास जाधव हे उपस्थित होते.
        तत्पूर्वी डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रमुख डॉ अमोल पवार यांनी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सर्व अद्यावत सोयी सुविधांची माहिती दिली. आज दोन अद्यावत व्हेंटिलेटर उपलब्ध केल्याची माहिती दिली, व राज्य शासनाने नियमित केलेल्या दरपत्रक प्रमाणे बिलांची आकारणी करण्यात येईल याची ग्वाही देण्यात आली. डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलचे प्रमुख एम डी मेडिसिन कन्सल्टंट डॉ. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांचा सत्कार करण्यात आला .
       तसेच डॉक्टर्स कोविड हाॅस्पिटल चे डाॅ.अमोल पवार, डॉ. मनोजकुमार इंगळकर, डॉ. श्रीकांत परमने, डॉ .आशुतोष पाटील, डॉ. सागर वरुडे, डॉ. प्रदिप भोसले, डॉ. नरेश बाबर, तसेच समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र (सशुल्क)चे डाॅ. दिपक सरनाईक, डॉ. किरण पाटील, डॉ.वर्षा भिसे, डॉ.किशोर पाटील, डॉ.सुशांत जगदाळे, डॉ.बालाजी भिसे, संग्राम जाधव, डॉ.प्रशांत घुणकीकर आदी डॉक्टर्स या कोविड आरोग्य केंद्रांचे काम पाहणार आहेत.
       उदघाटन भाषणात मंत्री डॉ. विश्वजित कदम साहेब यांनी पलूस तालुक्यात प्रशासनाच्या बरोबरीने सर्व डॉक्टर्स लोकांनी एकत्र येऊन अद्यावत कोविड हॉस्पिटल उभे केल्याबद्दल भरभरून कौतुक केले. अरुण आण्णा लाड व पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे यांनी आपले मनोगत मांडले व डॉक्टर्स कोविड टीमला शुभेच्छा दिल्या. डॉ मिलिंद जोशी यांनी पाहुण्यांचे आभार मानले तर श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले, यावेळी पलूस नगरपालिकेचे नगरसेवक विक्रम आप्पा पाटील, संदीप नाना सीसाळ, विशाल दादा दळवी, नितिन जाधव, उद्योजक ऋषिकेश आबा जाधव व मिलिंद बापू डाके, हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस आरोग्य कर्मचारी व पेशंट्सचे नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments