Daily Mahasatta

Daily Mahasatta

बीएसएफ जवान नानाश्री माने यांच्या निधनामुळे शोककळा

शिराळा (राजेंद्र दिवाण )
          पुनवत ता. शिराळा येथील बीएसएफ चे जवान नानाश्री भगवान माने (वय 30) यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने  सोमवार दि 28 रोजी निधन झाले. आज 1 ऑक्टोबर रोजी पुनवत येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पुनवत गावावर शोककळा पसरली आहे .
           जवान नानाश्री माने हे बीएसएफ च्या 133 बटालियन मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते .2009 मध्ये त्यांनी या सेवेचा आरंभ केला होता. काही दिवसांपूर्वी ते गावी सुट्टीवर आले होते .
सोमवार दि 28 रोजी सकाळी ड्युटीवर असताना त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना मिल्ट्रीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. माने यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगा, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments