Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात आज २४ पॉझिटिव्ह

: ऍक्टिव रुग्णांची संख्या ४८३ वर 
विटा ( मनोज देवकर )
       आज खानापूर तालुक्यात २४ जणांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. विटा शहरातील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हिवरे येथील एक , वेजेगाव येथील दोन , भाळवणी येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत . बलवडी ( भा ) येथील तीन , वासुंबे येथील एक , ढवळेश्वर येथील दोन , रामनगर येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
       खूप दिवसांनी उपचाराधीन रुग्णांची संख्या पाचशे च्या खाली आली. ४८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत . आजवर १४७८ रुग्ण बरे झाले असून मृतांची संख्या ५७ वर पोहचली आहे.

Post a Comment

0 Comments