म्हैसाळ योजने संदर्भात मंत्री जयंत पाटील सकारात्मक ; जत पूर्व भागातील ६७ गावांना होणार लाभ- अॅड. चन्नाप्पाणा होर्तीकर

 जत (सोमनिंग कोळी )
       जत पूर्व भागातील म्हैसाळ योजने पासून वंचित असलेल्या गावांना जलसंपदामंत्री जयंतजी पाटील साहेब हे लवकरच म्हैसाळ योजनेत समाविष्ट करून जत पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवतील व यासाठी वंचित गावातील लोकप्रतिनिधी यांची पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी चे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. चन्नाप्पाणा होर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

     यावेळी होर्तीकर म्हणाले की, जत पुर्व भागातील म्हैसाळ योजने पासून वंचित असलेल्या जत पूर्व भागातील प्रत्येक गावातील प्रतिनिधीनी सांगली येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील आठवड्यात जलसंपदा विभागातील सर्व अधिकार यांच्या सोबत पूर्व भागातील लोकप्रतिनिधींचे बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.

      तसेच स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की जत तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी गेले पाहिजे व जत तालुक्याचे नंदनवन झाले पाहिजे ते स्वप्न मी होर्तीकर च्या घरापर्यंत पाणी सोडून सत्यात उतरवणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जत पुर्व भागातील लोकप्रतिनिधी ना दिली असल्याची माहिती अँड. चन्नाप्पाणा होर्तीकर यांनी दिली. यावेळी तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, सरपंच राजु पाटील, उपसरपंच बाबु नागौड, शिवलिंग पाटील आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments