Daily Mahasatta

Daily Mahasatta

शरद पवारांना या वयात बांधांवर उतरावे लागते हेच महाआघाडीचे अपयश

सांगली (प्रतिनिधी)

         राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश आहे, अशी खरमरीत टीका भाजपा प्रवक्ते आ. गोपीचंद पडळकरांनी केली आहे. सांगली येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
      आ. पडळकर म्हणाले, शरद पवार यांनी ज्यांना सत्तेत बसविले आहे ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच या वयात देखील पवार यांना बांधावर जायला लागत आहे. शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे. मागच्या दौरादरम्यान शरद पवार साहेब हे विरोधी पक्षात होते तेव्हाचा होता. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत असल्याची टीका आ. गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
       राज्यातील  परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. वयाच्या 79व्या वर्षीसुद्धा शरद पवार नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्यानं अनेकांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. तर भाजपाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी मात्र  पवारांवर टीकास्त्रसुद्धा सोडलं आहे.
     काही महिन्यांपूर्वी शरद पवार हे राजकारणातील कोरोना आहेत अशी टीका करुन पडळकर यांनी वादळ उठवलं होत. त्यानंतर काही दिवसापूर्वी पडळकर यांनी आ. रोहित पवार यांच्या वर देखील टीका केली होती. त्यामुळे आमदार पडळकर यांच्या टीकेला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


 

Post a Comment

1 Comments

  1. गोपीचंद पडळकर साहेब कट्टर समर्थक जालना

    ReplyDelete