सांगली जिल्ह्यात आज २५० पाॅझीटीव्ह ; रुग्ण संख्या घटल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा

सांगली ( राजेंद्र काळे )
        सांगली जिल्ह्यात आज शनिवार ता. १० रोजी २५० रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर दिवसभरात दुप्पट पेक्षा अधिक म्हणजेच ५२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
        सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू होती. परंतु गेल्या पंधरा दिवसात रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे तर कोरोनामुक्त होणार्या रुग्णाच्या संख्येत दिलासादायक वाढ होत आहे. आज शनिवार ता.१० रोजी २५० रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात ५२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज सांगली महापालिका क्षेत्रात ४५ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर ३४ तर मिरज शहरातील ११ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- २०, जत -२१, कडेगाव - १०, कवठेमंकाळ -११, खानापूर - १८, मिरज- १९, पलूस- १९ शिराळा- २७, तासगाव- १८ आणि वाळवा - ४२ इतक्या रुग्णांचा
समावेश आहे.
        तर सांगली जिल्ह्यात आज १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments