कंठी येथील धनाजी मोठे खून प्रकरणी एकास पोलीस कोठडी, तिघे फरार

जत (सोमनिंग कोळी) 
         जत तालुक्यातील कंठी येथे धनाजी नामदेव मोटे (वय ४३) याचा गोळ्या झाडून व निर्घृणपणे डोक्यात हत्याराने वार करून खून करण्यात आला होता . ही घटना गुरुवारी रात्री घडली होती. खून प्रकरणी चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश भीमा लांडगे या संशयितास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
          मोटे खून प्रकरणातील तिघे संशयित अद्याप फरारी आहेत. या तिघांच्या अटकेसाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली आहेत. अधिक चौकशीसाठी नातेवाइकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे पोलिस अधिक कसून चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने नेमका खून कशाने करण्यात आला हे समजले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आरोपीच्या शोधात आहे .
................................

Post a comment

0 Comments