Daily Mahasatta

Daily Mahasatta

विधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड

सांगली (राजेंद्र काळे) 
        सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची विधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तदर्थ समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. यामध्ये नियम समितीचे प्रमुख महाराष्ट्र विधासभा अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले असून तदर्थ समितीचे प्रमुख महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ हे आहेत.
         नियम समितीमध्ये ११ सदस्य असतात. यामध्ये सभागृहातील कामकाजाची पद्धती व ते चालविण्याची रिती यांची नियम करण्यासाठी असलेल्या नियमांचा विचार करून त्यात आवश्यक वाटतील अशा सुधारणा तसेच सदस्यांनीही सुचविलेल्या सुधारणा यांचा विचार करून नियमात बदल सुचविणे, हे या समितीचे काम असते. तसेच सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणाऱ्या सर्व कागदपत्रांबाबत तदर्थ समितीचे 9 सदस्य असतात तसेच अहवालासंदर्भात होणारा विलंब टाळण्यासाठी, तसेच यासंदर्भात कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास विलंब का होतो ? त्याची कारणमीमांसा काय आहे ? ही कारणमीमांसा नियमाप्रमाणे समर्थनीय आहे किंवा कसे ? यासंदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीत कोणते बदल अपेक्षित आहेत ? या कार्यपद्धतीवर योग्य प्रकारे सनियंत्रण कशाप्रकारे ठेवता येईल ? इत्यादी बाबींचे परिनिरीक्षण करून सभागृहात अहवाल सादर करण्यासाठी लोकसभा व राज्यसभेच्या धर्तीवर “सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणेबाबत” या समितीची स्थापना झाली आहे.
        या निवडीमुळे आमदार सुधीर गाडगीळ यांचे मतदारसंघातून अभिनंदन होत आहे. 

Post a Comment

0 Comments