Daily Mahasatta

Daily Mahasatta

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच : प्रवीण दरेकर

आटपाडी : नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर.

विटा/ आटपाडी ( मनोज देवकर )
        आटपाडी तालुक्यातील तडवळे गावातील तरूण शुभम जाधव अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला होता . विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जाधव कुटूंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी कुटूंबाचे दु:ख ऐकताना प्रवीण दरेकर यांना अश्रु अनावर झाले, अतिवृष्टीतील अशा प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. पंचनाम्याची नाटकं बंद करावीत, नुकसानग्रस्तांना द्या तातडीने 10 हजारांची मदत असे प्रतिपादन दरेकर यांनी केले .
        आटपाडी तालुक्यातील दिघंची, विठलापूर , अनुसेमळा, ढोलेमळा भागातील नुकसान ग्रस्त डाळींब बागा व इतर शेतांना दरेकर यांनी भेटी दिल्या. त्यांच्या सोबत माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर , सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे ही दौऱ्यात सहभागी झाले होते.
         मदतीच्या याचनेतील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील भाव, हे सर्व बघून मन पिळवटून गेलं, पण मुर्दाड सरकारला काही पान्हा फुटत नाही. सरकारने त्वरित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी . आटपाडी तालुक्यातील अनेक रस्ते, पूल खचले आहेत . ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत असे मत यावेळी आ. गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. 

Post a Comment

0 Comments