लोकांना चांगल्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध : मंत्री डॉ विश्वजीत कदम

कडेगाव : येथे भारती हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या  कोविड डेडिकेटेड सेंटरच्या उद्घाटन  प्रसंगी मंत्री डाॅ.  विश्वजीत कदम. यावेळी आ. मोहनराव कदम, शांताराम कदम, जितेशभैय्या कदम उपस्थित होते.

नेर्ली/ कडेगाव (संदीप कुलकर्णी)
     कडेगाव पलूस मतदारसंघातील लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी लागेल ती मदत लोकप्रतिनिधी या नात्याने केली जाईल कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असे मत कृषी व सहकार राज्यमंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.
      मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे तसेच प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी तत्पर रहा अशा सूचनाही मी  प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे. सध्या कोरोना च्या दुसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरू आहे. आपण त्याचा विचार न करता स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेत व सतर्क रहात या संकटातून बाहेर पडूया, असे आव्हान राज्याचे कृषी व सहकार मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी नागरिकांना केले.
         कडेगाव येथे भारती हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज सेंटर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या  कोविड डेडिकेटेड सेंटरच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन माननीय शांताराम कदम, प्रांत अधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ शैलजा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे , भारती विद्यापीठाचे मानक व्यवस्थापक डॉक्टर एच एम कदम, युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम, कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अनिता देसाई तसेच सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, भारती हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज चे डीन डॉक्टर शहाजी देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव इंद्रजित साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 


 

Post a comment

0 Comments