सांगली जिल्ह्यला दिलासा, रुग्ण संख्या घटली, आज २३१ कोरोना पाॅझीटीव्ह

सांगली ( राजेंद्र काळे)
        सांगली जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात नवीन २३१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर ३२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यापैकी महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.
आज जिल्ह्यातील दहाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये आटपाडी जत१, कडेगाव - १, पलूस २, तासगाव ३, वाळवा - २, आणि महापालिका कार्यक्षेत्रातील २ जणांचा समावेश आहे. शुक्रवारी २३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील ४७ नागरिकांचा समावेश आहे. सांगलीतील ३३ आणि मिरजेतील १४ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आटपाडी तालुक्यातील ११, जत तालुक्यातील १७, कडेगाव -१६, खानापूर - ३६, पलूस - १०, कवठेमहांकाळ - ८, मिरज - १६, शिराळा - १९, तासगाव -१५ आणि वाळवा तालुक्यातील ३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
...............................

खानापूर तालुक्यात
आज ३३ पॉझिटिव्ह

: रेवणगाव व भवरवाडीत प्रत्येकी ५ पॉझिटिव्ह
विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी ३३ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. विटा शहरात ६, रेवणगाव व भवर वाडीत प्रत्येकी ५ , भाळवणीत ४ रुग्णांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. आळसंद , पारे, लेंगरे , माहुली व वासुंबे येथे प्रत्येकी दोन रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत . ढवलेश्वर , बामणी , शेंडगे वाडी येथील प्रत्येकी एक रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आलेत.
सद्या ४८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १५९८ रुग्ण बरे झाले असून आजवर खानापूर तालुक्यात ५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Post a comment

0 Comments