Daily Mahasatta

Daily Mahasatta

जतमधील प्रतापपुर येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात अडीच लाखांचे साहित्य जळून खाक

: हिरो कंपनीची ड्युईट दुचाकी जाळाली
जत ( सोमनिंग कोळी)
         जत तालुक्यातील प्रतापपुर येथील लता गुलाब मोटे या महिलेच्या झोपडीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेत दुचाकी व प्रापंचिक साहित्यासह एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत या महिलेचा मुलगा प्रकाश गुलाब मोटे याने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
         याबाबत अधिक माहिती अशी की, लता गुलाब मोटे या प्रतापपुर गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका झोपडीत व मुलाच्या घरापासून शंभर मिटर अंतरावर एकट्या राहण्यास आहेत.त्या सकाळी काही कामानिमित्त धावडवाडी येथे गेल्या होत्या. तर त्यांचा मुलगा प्रकाश मोटे हे महमदहुसेन अकबर शेख यांच्या रानात गेले होते. दरम्यान सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गणेश बाळु वाघमोडे याने घरामध्ये गॅसचा स्फोट होवुन घर जळाले असल्याची माहिती प्रकाशला सांगितली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या गॅस सिलेंडरच्या स्फोटात झोपडीचे घर पुर्णपणे जळाले होते. घरातील प्रापंचिक साहित्य व सोन्याची दागिने, हिरो कंपनीची ड्युईट दुचाकी ( MH 10 CY 5939 ) असे एकूण 2,50,000/- रुपयांचे नुकसान झाले आहे.
            घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश मोहिते, पोलीस नाईक प्रवीण पाटील, पोलीस कॉ विकास गायकवाड व आप्पासाहेब हाक्के यांनी भेट देऊन पंचनामा केला.अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments