विटा - कलेढोण रस्त्यावरील साळशिंगे येथील पूल धोकादायक

विटा ( मनोज देवकर )
        गेल्या चार दिवसात खानापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. साळशिंगे येथील विटा - कलेढोण रस्त्यावरील पूल भाग्यनगर तलावाच्या जवळ आहे. भाग्यनगर तलावाचे फुगवट्याचे पाणी या पुलाला टेकते. तश्यातच गेले दोन दिवस पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने पुलाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरंक्षक दगड वाहून गेले आहेत. पुलावर दीड फूट खोल खड्डे पडले आहेत. डांबरी रस्ता वाहून गेला आहे.
           या मार्गावरून विटा झरे प्रवास करणारे अनेक लोक कमी अंतरामुळे इकडून जातात. अवजड वाहनांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होते. खड्डे पडल्यामुळे व बाजूचे बांधकाम खचल्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सदर पूल दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सदर पुलावरून दरवर्षी पाणी जात असल्याने त्याची उंची वाढवण्याची ही गरज आहे.

Post a comment

0 Comments