Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात देशातील सर्वात मोठ्या ' शिवप्रताप ' ॲग्रोमॉलचे शनिवारी उद्घाटन

: प्रतापराव (शेठ) दादा साळुंखे यांची माहिती
: १५ हजार स्क्वेअर फूट जागेत मॉलची उभारणी
:  ७ हजार पेक्षा अधिक कृषी विषयक वस्तू उपलब्ध
: शनिवार ता. १७ रोजी ११ वाजता शिवप्रताप मंगल  कार्यालयात उद्घाटन सोहळा

विटा ( मनोज देवकर)
         देशातील सर्वात मोठ्या शिवप्रताप ॲग्रोमॉलचे शनिवार ता. १७ रोजी कृषी व सहकार राज्यमंत्री डाॅ विश्वजीत कदम यांच्याहस्ते विटा ( जि. सांगली) येथे उद्घाटन होते आहे. या उद्घाटन सोहळ्यास आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार मोहनराव कदम, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवप्रताप उद्योग समुहाचे सर्वेसर्वा प्रतापशेठ दादा साळुंखे यांनी दिली आहे.
         प्रतापशेठ साळुंखे म्हणाले, खानापूर तालुका हा सोने चांदी व्यवसायासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो. देशातील प्रत्येक  कानाकोपर्यात इथला माणूस व्यवसायानिमित्त विस्तारला आहे. परंतु याच विटयात शेतीच्या सर्व वस्तू मिळणारा तब्बल १५ हजार स्क्वेअर फूट जागेत मॉल साकारत आहे. मॉलचे उदघाटन व शेअर्स विक्री शुभारंभ सहकार व कृषी राज्य मंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत दादा कदम, आ. मा. अनिल भाऊ बाबर, मा. आ. मोहनशेठ दादा कदम, मा. अॅड. वैभव दादा पाटील, डॉ जितेश भैया कदम, कृषी संचालक मा. दिलीप झेंडे, जिल्हा कृषी अधिकारी मास्तोळी साहेब , मा. वैभव तांबे, श्री. प्रकाश कुंभार साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न होणार आहे. ज्यामध्ये शेतीविषयी सर्वकाही मिळणार आहे अशी माहिती मॉलचे संस्थापक मा. प्रतापराव (शेठ) दादा साळुंखे यांनी सांगितले.
     आपण कपडे, किराणा व वस्तूसाठी मोठमोठे मॉल पाहतो. परंतु शेती साहित्याचा मॉल आपल्याला देशात कोठेही  पाहायला मिळत नाही. त्यासाठी आम्ही शेतकर्याना एकाच छताखाली सर्व शेती साहित्य देण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी शेतकर्या ना नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे, ठिबक सिंचन, दगड वेचणी पेरणीपासून ते मळणी पर्यंतची  सर्व यंत्रे, माती - पाणी परीक्षण अशी परिपूर्ण सेवा या मॉल द्वारे मिळणार आहे. अतिशय नामवंत आणि दर्जेदार वस्तूचीच निवड केली आहे. त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्याना सोयीचे ठिकाण झाले आहे आणि हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत संचलित आहे. याचा मला सर्वात अभिमान आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
...........................
    सात हजारहून अधिक
    कृषी उपयोगी वस्तू उपलब्ध
     : संस्थेचे मॅनेजर महादेव घाडगे यांनी मॉलमध्ये  7000 हुन् अधिक् शेतकरी उपयोगी वस्तू पहावयास मिळणार असून त्याची केवळ विक्री नव्हे तर त्याची विक्रीपश्चात सेवा हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला आहे.  शेतकऱ्यांना मातीपरीक्षण पासून लागणी आणि काढणी पर्यंतचे तंत्रज्ञान याद्वारे पुरवले जाणार आहे. शेतकऱ्यांना शासकीय अनुदान व विमा शिवाय कर्जे याबाबत खास माहिती केंद्र स्थापन केले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना मोफत सल्ला देणार आहे. शेतकऱ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तरी सदर उदघाटन  कार्यक्रम फेसबूक लाईव्ह असणार आहे सर्व शेतकऱ्यांनी त्यामध्ये सामील व्हावे अशी संयोजकांनी  विनंती केली आहे.
................................

शासनाचा कृषी क्षेत्राकडे
बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक
         देशाचे कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय्य आहे. याशिवाय निसर्गाचीही साथ लाभत आहे. या सर्व गोष्टींचा लाभ उठवण्यासाठी एक व्यासपीठ किंवा दिपस्तंभ म्हणून आम्ही काम करू. मा. प्रतापशेठ दादा यांच्याकडून संधीचा फायदा कसा उठवावा आणि त्याचा लाभ आपल्या बरोबर  समाजाला कसा मिळवून द्यावा, ही बाब शिकण्यासारखी आहे. कृषी क्षेत्रात वाढणारा विकासदर, शासनाचे पोषक धोरण आणि निसर्गाची कृपादृष्टी या त्रिवेणी संगमाच्या पुरेपूर फायदा शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल च्या संकल्पनेने होणार आहे. 
मा. विठ्ठल साळुंखे,
चेअरमन,
शिवप्रताप ॲग्रोटेक शेतकरी
उत्पादक कंपनी, विटा.
.................................. 

Post a Comment

0 Comments