द्राक्ष बागायतदारांना पिक विमा भरपाई द्या - कडेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

 कडेगाव : तहसीलदार यांना कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष संदेश जाधव यांनी निवेदन दिले.

नेर्ली/ कडेगाव (संदीप कुलकर्णी)
        सन 2019- 20 यावर्षी अतिवृष्टीमुळे कडेगाव तालुक्यातील शेकडो हेक्टर द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांना पीक विम्याची भरपाई मिळावी, असे निवेदन कडेगाव तहसीलदार यांना कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष संदेश जाधव यांनी दिले.
         जाधव म्हणाले, कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने द्राक्ष उत्पादन करण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गाचा प्रकोप आणि कोरोना सारख्या महामारी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यात ही अशाच प्रकारचे नुकसान झालेले आहे. परंतु पिक विमा कंपनीकडून त्यांना भरपाई देण्यात आलेली आहे.
        मात्र कडेगाव तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करण्यात आलेला आहे. तसेच यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे. याचा विचार करून पिक विमा कंपनीने लवकरात लवकर कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ करून द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष सरकारला पत्करावा लागेल. तसेच पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर उपायोजना करून कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ करून द्यावा, असे निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केले.

Post a comment

0 Comments